संजय राऊतांची शिष्टाई फसल्यानंतर शरद पवार म्हणाले, गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करू!!


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक पक्षांबरोबर युती करून निवडणूक लढवेल, असे जाहीर केले आहे. After Sanjay Raut’s discipline failed, Sharad Pawar said, let’s experiment with Mahavikas Aghadi in Goa

गोव्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा केली होती. परंतु त्यांची राजकीय शिष्टाई फसली. महाविकास आघाडीचा राऊत यांनी मांडलेला प्रस्ताव काँग्रेसच्या गोव्यातील नेत्यांनी फेटाळला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गोव्यात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले. अर्थात या चर्चेचे तपशील त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले नाहीत.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांना बरोबर युती करून निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर मणिपूरमध्ये देखील छोट्या पक्षांशी युती करून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवेल, असे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनी गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्याबरोबर करणार असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी गोव्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांना राष्ट्रवादीतून फोडून तृणमूल काँग्रेस मध्ये घेतले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तृणमूल काँग्रेसमध्ये एक प्रकारे विलीनीकरणाच केले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी तृणमूल काँग्रेस बरोबर महाविकास आघाडीच्या करण्याच्या वाटाघाटी करणार असल्याचे सांगितले आहे.

After Sanjay Raut’s discipline failed, Sharad Pawar said, let’s experiment with Mahavikas Aghadi in Goa

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात