पंजाबचा मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांड नव्हे, तर पंजाबचे लोक निवडतील; नवज्योत सिंग सिद्धूंचे हायकमांडला आव्हान!!


वृत्तसंस्था

चंदीगड : पंजाब मध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण?, यावरून राजकीय घमासान टाळण्यासाठी काँग्रेस हायकमांडने नाव जाहीर करण्याचे टाळले. पण त्यामुळेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस हायकमांडलाच वेगळ्या प्रकारे आव्हान दिले आहे. पंजाबचा मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांड नव्हे, पंजाबचे लोक निवडतील, असे वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. The Chief Minister of Punjab will be elected by the people of Punjab, not the Congress High Command

या पत्रकार परिषदेत यांना एका पत्रकाराने काँग्रेस मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर का करत नाही?, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, की पंजाबचे लोक आमदार निवडून देतात. हेच आमदार मुख्यमंत्री निवडतात. तुम्हाला सांगितले कुणी की हायकमांड मुख्यमंत्री निवडतात? पंजाबचे लोक पाच वर्षांसाठी आमदार निवडतात. पंजाबच्या लोकांकडेच मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या गैरसमजात राहू नका की पक्षाचे हायकमांड मुख्यमंत्री निवडते!!, अशा शब्दात सिद्धू यांनी काँग्रेस हायकमांड आव्हान दिले आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांची एक राजकीय मोहीम पंजाब मध्ये काँग्रेस हायकमांडने यशस्वी केली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटविले. परंतु, त्यांच्या जागी नवज्योत सिंग सिद्धू यांची नेमणूक केली नाही. तर त्यांच्या ऐवजी चरणजीत सिंग ज्यांनी यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. त्यामुळे नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेस हायकमांडवर चिडलेले आहेत. त्यातूनच त्यांनी काँग्रेसचे हायकमांड मुख्यमंत्री निवडत नाही तर पंजाबची जनता मुख्यमंत्री निवडते, असे वक्तव्य करून एक प्रकारे काँग्रेस हायकमांडलाच आव्हान दिले आहे.

The Chief Minister of Punjab will be elected by the people of Punjab, not the Congress High Command

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात