मोठी बातमी : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत शरद पवारांनी समाजवादी पक्षासोबत युती केली जाहीर, म्हणाले- यावेळी परिवर्तन होणारच!

NCP entry in Uttar Pradesh politics, Sharad Pawar announced alliance with Samajwadi Party, said- change will happen this time

Sharad Pawar announced alliance with Samajwadi Party : नुकत्याच देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लक्ष आहे ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पाच पैकी तीन राज्यांत निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. एवढंच नाही, तर यूपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासोबत युती करणार असल्याचंही शरद पवारांनी जाहीर केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


वृत्तसंस्था

मुंबई : नुकत्याच देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लक्ष आहे ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पाच पैकी तीन राज्यांत निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. एवढंच नाही, तर यूपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासोबत युती करणार असल्याचंही शरद पवारांनी जाहीर केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, “गोव्यातही परिवर्तनाची आवश्यकता असून जनमत भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे या राज्यातील निवडणूक एकत्रित लढवण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. गोव्यात भाजपविरोधात महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा आमचा विचार आहे. या जागा वाटपाच्या चर्चेत मी स्वत: नसलो तरी आमच्या पक्षाच्या वतीने प्रफुल्ल पटेल, शिवसेनेच्या वतीने संजय राऊत आणि काँग्रेसचे तेथील नेते असतील. यासंबंधीच्या वाटाघाटी अजून अंतिम झालेल्या नाहीत,” असंही त्यांनी सांगितलं.

यूपीत समाजवादी पक्षासोबत युती करत असल्याचं सांगत शरद पवार म्हणाले की, “यूपीत लोकांना आता बदल हवा आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी आणि इतर सहकारी पक्षांची युती हा लोकांसाठी पर्याय आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता आपल्याला पाठिंबा देईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, आज योगींच्या मंत्रिमंडळातील मौर्य यांनी राजीनामा दिलाय. त्यांनी पक्षाचाही राजीनामा दिला. आणखीही काही बाहेर येतील.”

पाच राज्यांपैकी तीन राज्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. मणिपूरमध्ये पाच जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

NCP entry in Uttar Pradesh politics, Sharad Pawar announced alliance with Samajwadi Party, said- change will happen this time

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात