विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप उमेदवारांची यादी फायनल करण्यासाठी दिल्लीला गेले असताना श्रम आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला त्याच वेळी आणखी डझनभर आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे यांनी पत्रकारांना सांगितले. त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी भाजपमध्ये भूकंप – खळबळ अशा स्वरूपाने दिल्या आहेत.Swami Prasad Maurya resigns, warning of dozens of MLAs; Excitement in BJP or fear of MLAs cutting tickets?
पण खरच भाजपमध्ये भूकंप आणि खळबळ झाली आहे आहे का? की भाजप नेतृत्वाने ज्या आमदारांची तिकिटे कापण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनीच तिकीट कापले जाण्यापूर्वी भाजप सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठीच राजीनाम्याचा इशारा दिला आहे?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी – अमित शहा यांच्या भाजपची शैली लक्षात घेतली तर ते सर्वसामान्यपणे राजकीय पक्ष निवडणुकीची जशी तयारी करतात आणि जेव्हा तयारी करतात त्याच्या कितीतरी आधीपासून हे दोन्ही नेते निवडणुकीच्या तयारीला लागलेले असतात. त्यांच्या स्वतंत्र यंत्रणा प्रत्येक मतदारसंघाचा रिपोर्ट या दोन्ही नेत्यांकडे पोहोचवत असतात.
या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात अनेक आमदारांची तिकिटे कापण्याचा निर्णय झाला असेल तर त्या आमदारांनी स्वतःचे राजकीय भवितव्य ओळखून भाजपला इशारा दिला असेल तर तो भाजपसाठी इशारा नसून प्रत्यक्ष त्यांच्यासाठीच भाजपने दिलेला इशारा असल्याचे मानले पाहिजे…!!
त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य हे दलित, पिछडे रोजगार वगैरे शब्दांचे फवारे उडवून राजीनामा देऊन बाहेर पडले असले तरी आणि त्यांनी डझनभर आमदार भाजप मधून बाहेर पडणार असल्याचा दावा केला असला तरी त्यामागे भाजपा मधल्या खळबळ आणि अस्वस्थतेपेक्षा संबंधित आमदारांची अस्वस्थता आणि तिकीट कापले जाण्याची भीती यातूनच त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे असे मानले पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App