NCP Leader Nawab Malik Criticizes BJP MP Ravi Kishan who ate at Dalit house

दलिताच्या घरी जेवणाऱ्या भाजप खासदार रवी किशन यांना नवाब मलिकांचा टोमणा, म्हणाले- वाह बचवा वाह.. ज़िंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा!

NCP Leader Nawab Malik Criticizes BJP MP Ravi Kishan : दलित मतदार आणि ओबीसी समाजाचा यूपीच्या निवडणुकीत महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. प्रत्येक पक्षाला हा वर्ग आपल्या बाजूने करायचा आहे. स्वामी प्रसाद मौर्य आणि इतर काही दिग्गजांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यापासून ही व्होटबँक टिकवणे पक्षापुढे आव्हान बनले आहे. आता ते आव्हान कमी करण्यासाठी दलितांच्या भेटीगाठी, त्यांच्या घरी जेवण केले जात आहे. सीएम योगींनीही यापूर्वी ते केले आणि आता रवी किशन यांनीही जेवण केलं आहे. पण यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. NCP Leader Nawab Malik Criticizes BJP MP Ravi Kishan who ate at Dalit house


प्रतिनिधी

मुंबई : दलित मतदार आणि ओबीसी समाजाचा यूपीच्या निवडणुकीत महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. प्रत्येक पक्षाला हा वर्ग आपल्या बाजूने करायचा आहे. स्वामी प्रसाद मौर्य आणि इतर काही दिग्गजांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यापासून ही व्होटबँक टिकवणे पक्षापुढे आव्हान बनले आहे. आता ते आव्हान कमी करण्यासाठी दलितांच्या भेटीगाठी, त्यांच्या घरी जेवण केले जात आहे. सीएम योगींनीही यापूर्वी ते केले आणि आता रवी किशन यांनीही जेवण केलं आहे. पण यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

खासदार रवी किशन यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ते एका गरिबाच्या घरी जेवण घेत आहेत. तिथल्या लोकांना ते अन्न वाटप करतानाही दिसतात. ती छायाचित्रे शेअर करत रवी किशन यांनी सबका साथ सबका विकास अशी कॅप्शनही लिहिली आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड झाला आहे. यावर सर्वजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एका मुद्द्यावर बोट ठेवून टीका केली आहे.

मलिक यांच्या म्हणण्यानुसार, रवी किशन स्वत: कागदाच्या ग्लासमध्ये पाणी पीत आहेत, तर गरिबांना लोट्यातून पाणी देण्यात आले आहे. यावर त्यांनी ट्विट करून लिहिले की, पत्तल, सलाद, पुरी और भाजी दर्शाता है की माल रसोईये का है. दलित लोटे में पानी पिये और अभिनेता कगाज की गिलास में. वाह बचवा वाह.. ज़िंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा.” नवाब मलिक यांच्या या टोमण्याला रवी किशन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वास्तविक, रविकिशन यांच्या इतर फोटोंमध्येही अनेक जण जेवण करताना दिसत आहेत. यावेळी स्नेहभोजनादरम्यान कागदाचा ग्लास वाढलेले रविकिशन एकटेच नव्हते, हे वरील फोटोवरून दिसून येते. अनेक जणांना डिस्पोझल थाळ्यांमध्येही वाढण्यात आलेले दिसते.

तसे पाहिले तर यूपीच्या राजकारणात प्रत्येक पक्ष ओबीसी समाजाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे सपाच्या गोटात या समाजातील अनेकांनी भाजप सोडून प्रवेश केल्याने पक्ष आनंदी आहे. दुसरीकडे भाजप आपल्या उमेदवारांच्या आणि स्नेहभोजनाच्या रणनीतीवर फोकस करून पुन्हा एकदा हा समाज आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे.

NCP Leader Nawab Malik Criticizes BJP MP Ravi Kishan who ate at Dalit house

महत्त्वाच्या बातम्या