पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरने केली पाच कोटी रुपयांची संपत्ती दान


विशेष प्रतिनिधी

हमीरपूर : हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका निवृत्त झालेल्या डॉक्टरने आपल्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली पाच कोटी रुपयांहून अधिक संपत्ती दान केली आहे.नादौनच्या जोलसप्पड गावात सनकर येथील रहिवासी असलेले ७२ वर्षीय डॉक्टर राजेंद्र कंवर हे आरोग्य विभाग आणि त्यांची पत्नी कृष्णा कंवर या शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झाले होते.Doctor donates property worth Rs 5 crore to fulfill wife’s last wish

गेल्या वर्षी कृष्णा कंवर यांचे निधन झाले. दोघांना कुणीही वारस नसल्याने आपली संपूर्ण संपत्ती आपल्या पश्चात सरकारला दान करायची असं दोघांनीही ठरवलं होतं. पत्नीच्या निधनानंतर आता तिची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र कंवर यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत बैठक घेऊन आपली संपूर्ण संपत्ती सरकारला दान करत असल्याचं जाहीर केले.



ज्या लोकांना घरात राहण्यासाठी जागा दिली जात नाही आणि वृद्धापकाळात ज्यांना उन्हातान्हात भटकावं लागतं अशांसाठी सरकारने माझ्या संपत्तीतून मदतकार्य करावे, अशी अट मृत्यूपत्रात घातली आहे. त्यांनी स्वत:च्या घरासोबतच राष्ट्रीय महामार्गानजिकची पाच एकर जमीन आणि गाडी देखील सरकारला दान केली आहे.

आता एकट्यानं उर्वरित आयुष्य जगणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.डॉ. राजेंद्र कंवर यांनी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं आहे. त्यानंतर प्रॅक्टीस पूर्ण केल्यानं ३ जानेवारी १९७७ साली त्यांनी भोरंज येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी स्वीकारली.

नोकरीच्या कार्यकाळात रुग्णांप्रती सेवाभावानं काम केल्यानं त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. डॉ. कंवर सध्या जोलसप्पड येथे आपल्या राहत्या घरीच दररोज शेकडो गरीब रुग्णांवर मोफत उपचार करतात.

Doctor donates property worth Rs 5 crore to fulfill wife’s last wish

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात