मोदी सरकारकडून नेताजींना अनोखे स्मरण, आता सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती २३ जानेवारीपासूनच प्रजासत्ताक दिनाची सुरूवात


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यपूर्व काळात अखिल भारतीय कॉँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अनोखे स्मरण करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. आता प्रजासत्ताक दिनाची सुरुवात आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून म्हणजे नेताजींच्या जयंतीपासून होणार आहे.Unique reminder to Netaji from Modi Government, now Republic Day begins on 23rd January, the birthday of Subhash Chandra Bose

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने यापूर्वी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.



14 ऑ गस्टला स्मरण दिवस तर 31 ऑक्टोंबरला राष्ट्रीय एकता दिवस तर 15 नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिवस, 26 नोव्हेंबरला संविधान दिवस आणि वीर बाल दिवस साजरा करणाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यात आता सुभाषचंद्र बोस यांची जयंती प्रजासत्ताक दिनाच्या समारोहात साजरी केली जाणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत देशभरातील स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने एक योजना आखली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये पीटीआयने सांगितले होते की, 21 ऑक्टोबर 1943 रोजी बोस यांनी जाहीर केलेल्या तात्पुरत्या सरकारच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालय कार्यक्रमांचा भाग म्हणून क्युरेटेड टूरचे नियोजन करत आहे.

Unique reminder to Netaji from Modi Government, now Republic Day begins on 23rd January, the birthday of Subhash Chandra Bose

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात