निवासी शाळा व वसतिगृहांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने समग्र शिक्षा योजनेंतर्गत अनुदानीत निवासी शाळा व वसतिगृहांचे नाव “नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी शाळा / वसतिगृहे” असे करण्याचे ठरविले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेतल्याचे शिक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.Residential schools and hostels are named after Netaji Subhash Chandra Bose; Decision of the Union Ministry of Education

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून या शाळा आणि वसतिगृहांतील मुलांना प्रेरणा मिळावी. शिक्षक, कर्मचारी आणि प्रशासनाला उत्तेजन देण्यासाठी आणि उच्च दर्जा प्राप्त करण्यासाठी बोस यांचे नाव दिले जाणार आहे.समग्र शिक्षणांतर्गत शिक्षण मंत्रालय डोंगराळ भागातील, लहान व अत्यल्प वस्ती असलेल्या निवासी व निवासी व वसतिगृहे उघडण्यासाठी व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक मदत करते.

सार्वत्रिक प्रवेश निश्चित करणे, कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी शाळा सुरू करणे. शहरी आणि जेथे काळजी व संरक्षणाची गरज आहे, अशा शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा पुरविणे उद्दीष्ट आहे. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विशिष्ट कौशल्य प्रशिक्षण, शारीरिक आत्मरक्षा, वैद्यकीय सेवा, सामुदायिक सहभाग, मासिक वेतन यासारख्या सुविधा पुरविल्या आहेत.

Residential schools and hostels are named after Netaji Subhash Chandra Bose; Decision of the Union Ministry of Education

किती शाळा आणि वसतिगृहे

1) राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत निवासी सुविधा :1063
2) निवासी शाळा : 383
3) वसतिगृहे : 680
4) पश्चिम बंगालमध्ये निवासी शाळा : 12
5) पश्चिम बंगालमध्ये वसतिगृहे : 19

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था