जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, पिस्तूल आणि दारुगोळा जप्त

Jammu Kashmir one terrorist killed in an encounter Shopian

Jammu Kashmir : जम्मू -काश्मीरच्या शोपियांतील कुशवा भागात गुरुवारी सकाळी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितले की, काल रात्री अनायत अशरफ दार या दहशतवाद्याने कुशवा गावात एका नागरिकावर गोळीबार केला आणि त्याला जखमी केले. Jammu Kashmir one terrorist killed in an encounter Shopian


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या शोपियांतील कुशवा भागात गुरुवारी सकाळी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितले की, काल रात्री अनायत अशरफ दार या दहशतवाद्याने कुशवा गावात एका नागरिकावर गोळीबार केला आणि त्याला जखमी केले.

सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर, काश्मीर पोलिसांनी कुशवा गावात CASO ऑपरेशन सुरू केले आणि परिसराला घेराव घातला. ते म्हणाले की, दहशतवाद्याला आधी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते, पण त्याने तसे केले नाही. नंतर तो चकमकीदरम्यान ठार झाला. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. जखमी नागरिक अजूनही रुग्णालयात दाखल आहे.

गोळी लागलेल्या व्यक्तीचे नाव जमीर अहमद भट असून ते व्यवसायाने दुकानदार आहेत आणि डांगरपोरा चित्रगम कलां येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भट यांच्या पायाला गोळी लागल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, जेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. जम्मू -काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “रात्री 9:45 च्या सुमारास शोपियान पोलिसांना शोपियांमधील चित्रगाम कलां भागात दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली, जिथे दहशतवाद्यांनी एका नागरिकावर गोळीबार केला.

Jammu Kashmir one terrorist killed in an encounter Shopian

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात