हत्या की आत्महत्या? : नरेंद्र गिरींच्या मृत्यूशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर, मृतदेह लटकलेला होता, तर पंखा सुरू कसा?

Narendra Giri Suicide Case Another Video Went Viral Shows Fan Kept Running While deadbody on floor

Narendra Giri Suicide Case : आखाडा परिषदेच्या अध्यक्षाच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो घटनेनंतर लगेचच पोलीस पोहोचल्याचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महंतांचा मृतदेह त्यात जमिनीवर पडलेला दिसतो आणि खोलीचा पंखा सुरू असतो. व्हिडिओमध्ये आयजी केपी सिंह मठात राहणाऱ्या शिष्यांची यासंदर्भात चौकशी करताना दिसत आहेत. Narendra Giri Suicide Case Another Video Went Viral Shows Fan Kept Running While deadbody on floor


विशेष प्रतिनिधी

प्रयागराज : आखाडा परिषदेच्या अध्यक्षाच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो घटनेनंतर लगेचच पोलीस पोहोचल्याचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महंतांचा मृतदेह त्यात जमिनीवर पडलेला दिसतो आणि खोलीचा पंखा सुरू असतो. व्हिडिओमध्ये आयजी केपी सिंह मठात राहणाऱ्या शिष्यांची यासंदर्भात चौकशी करताना दिसत आहेत.

1.45 मिनिटांचा हा व्हिडिओ त्या खोलीचा आहे ज्यात महंतांचा मृतदेह लटकलेला आढळला. व्हिडिओ सुरू होताच महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसतो आणि त्यांच्या शेजारी बलबीर गिरी आहेत, ज्यांचा महंत यांच्या कथित सुसाईड नोटमध्ये उत्तराधिकारी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. व्हिडिओच्या पुढील फ्रेममध्ये एक फोटोग्राफर आणि कॉन्स्टेबल दिसत आहेत. यानंतर कॅमेरा खोलीत पडलेल्या बेड आणि तिथे चित्रे आणि प्रमाणपत्रांच्या दिशेने सरकतो.

पुढील फ्रेममध्ये कॅमेरा खोलीतील पंख्याकडे निर्देशित केला जातो, ज्यामध्ये पंखा सुरू असलेला दिसतो. त्यात पंख्याच्या रॉडला पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीचा एक भाग अडकलेला दिसतो, याच्याच फासावर महंतांचा मृतदेह लटकलेला आढळला.

थोड्याच वेळात, आयजी के.पी.सिंह महंतांच्या शिष्यांना खोलीच्या दारात उभे राहून पंखा सुरूच होता की की कोणीतरी सुरू केला, याची विचारपूस करताना दिसत आहेत. यावर सुमीत नावाचा शिष्य आधी म्हणतो की त्याने पंखा सुरू केला. पण जेव्हा आयजी त्याला याबद्दल विचारतात तेव्हा तो उत्तर देत नाही आणि इतर गोष्टी सांगू लागतो.

मोठा प्रश्न, दोरीचे तीन भाग कसे झाले?

व्हिडिओ पाहिल्यानंतर, सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की, ज्या दोरीने महंतांनी फाशी घेतली तिचे तीन भाग कसे झाले? जरी दोरी कापून मृतदेह फासातून खाली आणला गेला असे मानले तरी हा प्रश्न अनुत्तरितच आहे. कारण यामध्येही दोरीचे फक्त दोन भाग असतील. तर खोलीतील दोरी तीन भागांमध्ये विभागलेली आढळली.

पहिला भाग पंख्याला अडकलेला आढळला. दुसरा भाग महंतांच्या गळ्याभोवती अडकला होता. तर दोरीचा तिसरा भाग खोलीत पडलेल्या काचेच्या टेबलावर पडलेला आढळला. असेही म्हटले जात आहे की जर मृतदेह काढल्यानंतर महंताच्या गळ्यातून दोर काढायचा होता तर गाठ उघडून ती वेगळा झाली असती. त्याऐवजी, दोरीचे दोन भाग केले गेले, ज्यामध्ये एक भाग त्यांच्या गळ्यात राहिला.

Narendra Giri Suicide Case Another Video Went Viral Shows Fan Kept Running While deadbody on floor

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात