काँग्रेसने 50% आश्वासने जरी पूर्ण केली असती तर लोकांनी तिला सत्तेबाहेर का काढले असते?; मायावतींचा खोचक सवाल


वृत्तसंस्था

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या माजी मुख्यमंत्री मायावती आज बरेच दिवसांनी बोलल्या आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर तसेच काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर निशाणे साधले आहेत.If Congress had fulfilled 50% of its promises, why would people have taken her out of power ?; Mayawati’s sharp question

काँग्रेस पक्षावर लोकांचा आता फारसा विश्वास उरलेला नाही. काँग्रेसने आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत जेवढी आश्वासने दिली त्यापैकी 50 टक्के आश्वासने जरी पूर्ण केली असती तर जनतेने काँग्रेसला केंद्रात आणि उत्तर प्रदेशात सत्तेबाहेर का हाकलून दिले असते?, असा खोचक सवाल मायावती यांनी केला आहे.



 

त्याच वेळी मायावती यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर देखील टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार अर्धवट प्रकल्पांची उद्घाटने करत आहेत. आपण भूमिपूजन केले. उद्घाटन पण आपणच करू या हेतूने गेल्या दीड दोन महिन्यांमध्ये योगी सरकारने उद्घाटनांचा सपाटा लावला आहे. पण ही सगळी कामे अर्धवट आहे.त हा सिलसिला निवडणूक आचारसंहिता जाहीर होईपर्यंत जारी राहील, असे टीकास्त्र मायावती यांनी सोडले आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या उत्तरप्रदेशच्या जाहीरनाम्यात आश्‍वासनांची खैरात केली आहे. मुलींना मोफत स्कुटी देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याखेरीज विविध सवलती यांनी जाहीर केल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर मायावती यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीकास्त्र सोडले आहे. ६० वर्षे काँग्रेस सत्तेवर होती. त्यांनी जेवढी आश्वासने दिली, त्याच्या 50% आश्वासने जरी पाळली असती तरी लोकांनी काँग्रेसला सत्तेवरून पायउतार केले नसते असे त्या म्हणाल्या.

If Congress had fulfilled 50% of its promises, why would people have taken her out of power ?; Mayawati’s sharp question

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात