सर्वाधिक लसींचा पुरवठा करूनही महाविकास आघाडी सरकारची तक्रार, डॉ.भारती पवार यांचा आरोप


केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. Despite of supplying most vaccines, Mahavikas Aghadi government complaints, allegation of Dr. Bharti Pawar


विशेष प्रतिनिधी

पालघर : केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला पालघरमधून सुरुवात झाली. मोदी सरकारच्या कामाची, महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी दाखवण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे. कोविड प्रतिबंधा नियम पाळून जास्त गर्दी न करता ही यात्रा करणार असल्याचंही पवार यांनी सांगितले.

डॉ.पवार म्हणाल्या, आपल्या या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ग्रामीण भागातल्या लसीकरणाची माहिती घेणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं ही आपली जबाबदारी आहे. कोणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये हाच या जनआशीर्वाद यात्रेचा हेतू असणार आहे.

Despite of supplying most vaccines, Mahavikas Aghadi government complaints, allegation of Dr. Bharti Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात