तालिबानच्या घुसखोरीनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरने सुटका, भारतीयांनाही सुखरुप सोडवले


विशेष प्रतिनिधी

काबूल – तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शिरकाव केल्यानंतर अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिलखती वाहनातून विमानतळाच्या दिशेने नेण्यात आले.USA and Indians rescued from Afghanistan safely

भारतानेसुद्धा अफगाणिस्तातील भारतीयांना मायदेशात आणण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियाचे एआय-२४४ विमान काबूलहून १२९ भारतीयांना घेऊन सायंकाळी नवी दिल्लीत दाखल झाले.
शनिवारी काबूल शहराबाहेर तालिबानी फौजा दाखल झाल्याचे समोर आल्यानंतर अनेक देशांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात होती.त्यामुळे अमेरिकेने आपल्या दूतावासातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुखरूप मायदेशी नेण्याचे प्रयत्न सुरू केले असताना दुसरीकडे हजारो सामान्य नागरिकांनी काबूलमधील उद्याने आणि मैदानांमध्ये आसरा घेतला.काबूलमध्ये तालिबान्यांनी शिरकाव केल्यानंतर अनेक देशांनी अफगाणिस्तानातील त्यांच्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

USA and Indians rescued from Afghanistan safely

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था