स्वातंत्र्यरथावर वीर सावरकरांचा फोटो असल्याने कार्यक्रम उधळला, कट्टर मुस्लिम पक्ष सोशल डेमॉक्रॅटीक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कर्नाटकात गोंधळ


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : स्वातंत्र्यदिनानिमित्त काढलेल्या यात्रेतील स्वातंत्र्यरथावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो असल्याने सोशल डेकॉक्रॅटीक या कट्टर मुस्लिम पक्षाने कार्यक्रमच उधळून लावला. वीर सावरकर यांच्या जागी त्यांनी टिपू सुलतानाचा फोटो स्वातंत्र्यरथावर लावला. कर्नाटकातील काबका ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला.Veer Savarkar’s photo on Independence Day disrupts program, activists of hardline Muslim party Social Democratic Party riot in Karnataka

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टर मुस्लिम संघटनेची सोशल डेमॉक्रॅटीक पार्टी ही राजकीय आघाडी आहे. या पक्षाचे कार्यकर्ते सातत्याने हिंदू प्रतिकांवर हल्ले चढवित असतात.काबका ग्रामपंचायतीचे सरपंच विनय कुमार यांनी झेंडा दाखवून स्वातंत्र्यदिनाची यात्रा सुरू झाली. मात्र, एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी हा रथ अडविला.



स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो काढून त्याठिकाणी टिपू सुलतानाचा फोटो लावण्याची मागणी त्यांनी केली. सरपंचांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, टिपू सुलतानाचा फोटो वापरावा यासाठी ते आग्रही होते. शेवटी पोलीसांना हस्तक्षेप करावा लागला.

कर्नाटकचे सामाजिक न्याय मंत्री धक्षनिवास पुजारी म्हणाले, स्वातंत्र्यदिनाच्या रथावर सावरकरांच्या फोटोला विरोध करून एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, दक्षिण कर्नाटकात तालीबानी संस्कृती आम्ही येऊ देणार नाही. गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

आमदार संजीव मतनदूर यांनी एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाइॅची मागणी केली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गृह मंत्र्यांना निवेदन दिले असून एसडीपीआयच्या देशद्रोही कृत्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.

Veer Savarkar’s photo on Independence Day disrupts program, activists of hardline Muslim party Social Democratic Party riot in Karnataka

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात