मनी मॅटर्स : तुमची सवय उधळपट्टीची की बचतीची, यावरच ठरते श्रीमंतीची वाटचाल


सवय ही अशी गोष्ट असते की त्यामुळे माणसाचे एक तर कल्याण तरी होते किंवा नुकसान तर होते. आपल्या प्रत्येकाला आपल्याला कोणत्या सवयी आहेत याची माहिती असते. त्यातील कोणत्या सवयी चांगल्या आहे त व कोणत्या वाईट हे सुद्धा चांगलेच माहीती असते. पैशांच्याबाबतीच या सवयींचा फार मोठा परिणाम होत असतो. मात्र आपण त्याचा साकल्याने विचार करीत नाही. Whether you have a habit of wasting or saving, the path to wealth depends on it

त्यामुळे खिशात पैसे असताना किती पैसे आहेत याची मोजदाद न करता मौज करणे असो वा खिशात पैसे असताना एकही पै न खर्च करणे याला सवयच जबाबदार ठरते. पण सवय आहे म्हणून आर्थिक बाबीमध्ये रिस्क घेणे कधीही त्रासदायकच असते. एका सर्वेक्षणात असे आढळले की 24 टक्क्यांहून अधिक व्यक्तींनी सांगितले की भविष्यासाठी ते करत असलेली गुंतवणूक सध्याच्या त्यांच्या उत्पन्नापेक्षा अतिशय कमी आहे.

जवळजवळ सध्याच्या उत्पन्नाच्या ती पाच टक्के इतकीच आहे. शिवाय या सर्वेक्षणात २५ टक्के व्यक्तींनी सांगितले की त्यांना भविष्यात त्यांच्या निर्वाहासाठीचीही रक्कम आताच साठवून ठेवावी लागणार आहे. यासाठी ते सध्याच्या उत्पन्नातून पाच ते दहा टक्के रक्कम बाजूला काढतात. या सर्वेक्षणातील जवळजवळ सर्वच लोकांना माहित आहे की त्यांची सध्याची जीवनशैली पाहाता भविष्यकाळासाठीची ही तरतूद फारच कमी आहे.

या लोकांना आर्थिक बाबींची पुरेशी माहिती असल्याने त्यांनी किमान विचार केला आणि भविष्याकाळातल्या तरतूदीसाठी किमान एक पाऊल तर उचलले आहे. आपणही या अभ्यासावरून काही शिकले पाहिजे. म्हणजे असे की किमान आता जगतो आहोत तशीच जीवनशैली जगण्यासाठी आताच बचत करायला हवी. भविष्यकाळच्या या तरतुदीमध्ये नोकरीतून निवृत्ती मिळाल्यानंतर हयात असू तोपर्यंतचा दोघांचा –बायको आणि आपण स्वतःचा खर्च अंतर्भूत असणार आहे.

त्यामुळे दर महिन्याचा किराणा माल, दवाखाना- औषध, प्रवास, थोडी मौज यांचा खर्च येथे लक्षात घ्यावा लागणार आहे. समजा चर आपल्याला उधळपट्टी करण्याची सवय असेल तर त्याचे फाजील समर्थन न करता तत्काळ त्यात बदल करून बचतीची सवय अंगी बाळगायला पाहिजे.

Whether you have a habit of wasting or saving, the path to wealth depends on it

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात