विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलात २८ हजारांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत. लष्कर, नौदल, हवाई दल याबरोबर केंद्रीय राखीव पोलीस बल, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात या जागा आहेत.28,000 posts will be recruited in the army and paramilitary forces
लष्कराच्या सैन्य भरती कार्यालयाच्या मार्फत यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना भारतीय लष्कराच्या भरती पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठीची शेवटची मुदत २१ ऑगस्ट २०२१ आहे.
स्टाफ सिलेक्शन कमीशनने केंद्रीय राखीव पोलीस बल, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यामध्ये कॉन्स्टेबल आणि रायफलमॅनच्या २१,२७१ जागा भरण्यासाठी नोटीफिकेशन काढले आहे.ssc.nic.in वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार आला अर्ज भरू शकतात. त्यासाठीची शेवटची मुदत ३१ ऑगस्ट २०२१ आहे.
सीमा सुरक्षा बल (बीएसएफ)मध्ये २६९ जागांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत २२ ऑगस्ट आहे. कॉन्स्टेबल पदाच्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकतात.केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या देशातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांत वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या २४३९ जागांसाठी १३ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखत (वॉक इन इंटरव्ह्यू) होणार आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी उपक्रमात इंजिनिअरच्या पाचशे जागांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनिअर पदासाठी ३०८ आणि प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी २०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. www/belindia.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App