राज्यसभेच्या तालिकेवर जाण्यास विरोधी पक्षाच्या तीन खासदारांचा नकार, वंदना चव्हाणांसह तिघांनी सभापतीपद स्वीकारण्यास दिला नकार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत वंदना चव्हाण यांच्यासह राज्यसभेच्या तीन सभापती तालिकेवरील खासदारांनी सभापतीपदाचे कामकाज करण्यास नकार दिला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांकडून दररोज गोंधळ घातला जात होता.Opposition MPs refuse to go to Rajya Sabha chair, Vandana Chavan and three others refuse to accept Speaker’s post

विरोधी खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये (सभापतींसमोरील मोकळी) घुसत घोषणाबाजी केली होती. राज्यसभेत पेगासस हेरगिरी, कृषि कायदे आणि इंधन दरवाढीवर फलक फडकावित घोषणाबाजी केली होती.या पार्श्वभूमीवर वंदना चव्हाण आणि त्यांच्या दोन सहकारी खासदारांनी याचा निषेध करण्यासाठी सभागृहाचे सभापती होण्यास नकार दिला आहे.



राज्यसभेचे सभापती किंवा उपसभापती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 12 पीठासीन अधिकारी असतात. त्यामध्ये वंदना चव्हाण, कॉँग्रेसचे खासदार एल हनुमंथैया आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सुखेंदू शेखर रे यांचाही समावेश आहे. मात्र, त्यांनी आता पीठासीन अधिकारी होण्यास नकार दिला आहे.

वंदना चव्हाण म्हणाल्या की राज्यसभेत गोंधळ सुरू असताना मी काम करणे नैतिकदृष्टया योग्य नाही. तीनही पीठासीन अधिकाऱ्यांनी उपसभापती हरिवंश यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली भूमिका मांडली. उपसभापतींनी आमची बाजू समजावून घेतली असून लवकरच परिस्थिती सुधारेल असा विश्वास केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारी वेळेपूर्वीच तहकूब करण्यात आले आहे. संसदेत या अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सतत गोंधळ घातल्याने कामकाज होऊ शकले नाही.

पीठासीन अधिकारी असलेले बिजू जनता दलाचे भर्तृहरी महताब म्हणाले की, या तीन नेत्यांचा निर्णय योग्यच आहे. सभापतींच्या अनुपस्थित सभागृह चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र, सरकारकडून अनेक गोष्टींवर चर्चा होत नसल्याने खासदार निषेध करत आहेत. त्यामुळे या परिस्थितीत त्यांच्यावर सभागृह चालविण्याची सक्ती करता येणार नाही.

Opposition MPs refuse to go to Rajya Sabha chair, Vandana Chavan and three others refuse to accept Speaker’s post

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात