मुबंईत लोकल प्रवासाला मिळणार उत्तम प्रतिसाद, लस घेतलेल्या तब्बल ५५ हजार काढला लोकलचा पास


विशेष प्रतिनिधी

मुंबई – दोन दिवसांत ५५ हजार लसधारकांनी लोकलचा मासिक पास काढला आहे. पहिल्या दिवशी ३४ हजार ३५३ आणि दुसऱ्या दिवशी २० हजार ६३७ प्रवाशांनी ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून मासिक पास काढला आहे. 55 thousand people took local pass

कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करता येणार आहे. यासाठी मागील दोन दिवसांत पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकावर सर्वाधिक १ हजार ६६५ नागरिकांनी मासिक पास काढले; तर मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकावर १ हजार ८८१ नागरिकांनी मासिक पास काढले आहेत.पहिल्या दिवशी पश्चिम रेल्वेवर ११ हजार ६६४ आणि मध्य रेल्वेवर २२ हजार ६८९ नागरिकांनी मासिक पास घेतला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ५ हजार ९४९ आणि मध्य रेल्वेवर १४ हजार ६८८ जणांनी मासिक पास काढले

55 thousand people took local pass

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती