महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, लहान मुलांनाही लागण


विशेष प्रतिनिधी

मुंबई – राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ६६ रुग्ण आढळले असून त्यातील ६१ रुग्ण कोविड आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. या रुग्णांपैकी ३१ रुग्ण हे लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्याचीदेखील आवश्यकता भासलेली नाही. Delta plus patients increasing in Maharashtra

दरम्यान, या ६६ रुग्णांपैकी १० जणांनी कोविडचे दोन्ही डोस घेतले होते. ८ जणांनी केवळ एक डोस घेतलेला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी २ व्यक्तींनी कोवॅक्सिन; तर इतर सर्वांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे.
राज्यात सध्या डेल्टाचे पाच सक्रिय रुग्ण आहेत.



 

चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांपैकी सात रुग्ण म्हणजेच १० टक्के रुग्ण हे लहान मुल आहेत; तर सर्वाधिक ३३ रुग्ण १९ ते ४५ वयोगटातील आहेत. त्या खालोखाल ४६ ते ६० वर्षे वयोगटातील १८ रुग्ण आहेत. ६० वर्षांवरील ८ रुग्ण आहेत. या ६६ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३४ स्त्रिया; तर ३२ पुरुष आहेत.

Delta plus patients increasing in Maharashtra

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात