विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये देशभक्तीपर अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीदिनी २७ सप्टेंबरपासून हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. Delhi school now teach patriotic subjects says kejariwal
केजरीवाल म्हणाले, की, ‘गेल्या ७४ वर्षांपासून आपण मुलांना अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, भुगोल, गणित आदी विषय शिकवत आहोत; मात्र देशभक्तीचा या अभ्यासक्रमात समावेश नाही. कारण मुलांमध्ये ही भावना आपोआप निर्माण होईल असे आपल्याला वाटते;
मात्र आता शाळेपासूनच मुलांना आपल्या देशाचा अभिमान वाटावा व त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी देशभक्ती विषयाचाही अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे.’ या विषयाची कोणतीही परीक्षा असणार नाही. देशाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी मुलांना स्वातंत्र्य लढाईच्या व देशाभिमानाच्या कथा या अभ्यासक्रमात सांगितल्या जातील, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.
ते म्हणाले, दिल्लीने संपूर्ण जगाला योगासने दिली; पण आता ती नामशेष होत आहे. त्यामुळे दिल्ली सरकारतर्फे योग शिक्षक आणि प्रशिक्षकांची एक मोठी टीम तयार करण्यात येईल. किमान ३०-४० लोकांच्या ज्या गटाला योगा शिकायचा आहे, त्यांना सरकारतर्फे योग प्रशिक्षक दिला जाईल. तसेच हे योगाचे वर्ग सरकारतर्फे चालवले जातील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App