विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीत गायल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचे आवाहन केले होते. केंद्राच्या आवाहनाला जगभरातून दीड कोटी भारतीयांनी प्रतिसाद दिला. एकाच दिवशी एकाच विषयावरील एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिडीओ अपलोड केल्याने विक्रम रचण्यात आला.1.5 cr Indians upload vdo of national anthem recording
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील जनतेने ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जगभरातील दीड कोटींहून अधिक भारतीयांनी राष्ट्रगीत गातानाचे व्हिडीओ अपलोड करत विक्रम नोंदवला आहे.
हे अभियान भारतीयांमधील एकता, क्षमता आणि सौर्हादाचे प्रतीक ठरले आहे. या अभियानात प्रख्यात कलाकार, राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी, सैन्यातील जवान, प्रसिद्ध खेळाडू तसेच सर्वसामान्य जनतेने सहभाग नोंदवल्याचे केंद्राने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App