डेक्कन क्वीनच्या शिरपेचात विस्टाडोममुळे मानाचा आणखी एक तुरा, निसर्गरम्य सौंदर्य अनुभवल्याने प्रवासी सुखावले


विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबई – पुणे मार्गावर डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडून चालविण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधील विस्टाडोम कोचच्या पहिल्या फेरीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला.Wistadome coach attached to Deccan queen enjoyed by people

पावसाळ्यात धबधबे, नाले, झरे, हिरवळ असे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवण्यासाठी प्रवासी विस्टाडोममधून प्रवास करत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून विस्टाडोमच्या सर्वच्या सर्व एकूण ४० आसने आरक्षित झाली. पावसाळ्यात घाटांची दृश्ये मोठ-मोठ्या खिडक्यामधून बघता येत आहेत. त्यामुळे खूप आनंद होत आहे. स्वातंत्र्यदिनी विस्टाडोम कोच जोडण्याचा रेल्वेचा उपक्रम खूप चांगला असल्यामचे प्रतिक्रया प्रवाशांनी दिल्या्.



मध्य रेल्वेवरील मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसला एलएचबी कोचसह विस्टाडोम कोच २६ जून रोजी जोडण्यारत आला. या कोचमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू आहे. या कोचमध्ये एका महिन्यात प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

त्यामुळे मुंबई-पुणे या मार्गावर धावणाऱ्या आणखीन एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडण्याचे नियोजन सुरू होते. प्रवाशांच्या मागणीनुसार १५ ऑगस्टला डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेसला विशेष विस्टाडोम कोच जोडला. या मार्गावर जोडण्यात आलेला हा दुसरा विस्टाडोम कोच आहे.

Wistadome coach attached to Deccan queen enjoyed by people

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात