मि. प्रेसिडेंट बायडेन अक्षरश: तोंडावर आपटले; ३८ दिवसांपूर्वी म्हणत होते, अफगाणवर तालिबानचा कधीच कब्जा होणार नाही!


विशेष प्रतिनिधी

काबूल : देशाच्या सर्व भागावर कब्जा मिळविल्यानंतर आता तालीबानी काबूलमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत. अफगणिस्थानचे अध्यक्ष अब्दुल घनी पळाले असून तालीबानींनी सत्ता ताब्यात घेतली आहे. मात्र, यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन अक्षरश: तोंडावर पडले आहेत. ३८ दिवसांपूर्वीच बायडेन म्हणाले होते की तालीबान कधीही अफगणिस्थानवर कब्जा घेऊ शकणार नाहीत.President Biden was literally slapped in the face; He was saying 38 days ago, Taliban will never occupy Afghanistan!

बरोबर ३८ दिवसांपूर्वी ज्यो बायडेन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले होते की अमेरिकी सैन्य अफगणिस्थानधून काढून घेतल्यावर तालीबान अफगणिस्थानवर कब्जा घेऊ शकेल का? यावर बायडेन म्हणाले होते की असे कदापिही होऊ शकणार नाही. कारण अफगणिस्थानकडे तीन लाखांचे प्रशिक्षित सैन्य आहे.



अमेरिकेने त्यांना प्रशिक्षित केले आहे. त्याचबरोबर सक्षम हवाईदल आहे. केवळ ७५ हजार तालीबानींना ते कधीही चिरडून टाकू शकतील. अफगाण लष्कराला विश्वास आहे की ते तालीबानींशी मुकाबला करू शकतील. त्याचबरोबर अमेरिकन गुप्तचरांचे अहवालही आहेत की तालीबानींचे बळ कमी झाले आहेत.यावेळी पत्रकारांनी बायडेन यांना विचारले होते की व्हिएतनामीसारखीच अमेरिकेची अफगणिस्थानमध्येही गत होईल का? यावर बायडेन म्हणाले होते की तालीबानी म्हणजे व्हिएतनामी बंडखोर नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचीतुलना करणे चुकीचे आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडल्याने अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या ताब्यात गेले आहे. तालिबानच्या प्रतिनिधींसोबत काबुलमधील चचेर्नंतर गनी यांनी हा निर्णय घेतला. गनी यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहीब यांच्यासह इतर नेत्यांनीही देश सोडला आहे. हे सर्व नेते शेजारीच्या ताजिकिस्तानमध्ये आश्रयाला गेले आहेत.

अफगाणिस्तान सरकारची अखेरची आशा असलेल्या राजधानी काबुलवरही तालिबानने ताबा मिळवला आहे. तालिबानने २० वर्षांनी पुन्हा काबुल आपल्या ताब्यात घेतले आहे. २००१ मध्ये अमिरिकेच्या हल्ल्यानंतर तालिबानी काबुल सोडून पळाले होते.

तालिबानचा राजनैतिक कार्यालयाचा प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर हा काबुलमध्ये दाखल झाला आहे. तालिबानकडे शांततेत सत्ता हस्तांतर करण्यास तयार असल्याचे अफगाण सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अब्दुल गनी बरादर हा तालिबानचा नवा राष्ट्रपती बनू शकतो. अफगाणिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री अली अहमद जिलाली यांना अंतरिम प्रशासनाचे प्रमुख बनवले जाऊ शकते.

President Biden was literally slapped in the face; He was saying 38 days ago, Taliban will never occupy Afghanistan!

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात