म्यानमारमध्ये एटीएममधून पैसे काढण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासूनच रांगा, आर्थिक स्थिती चिंताजनक


विशेष प्रतिनिधी

यंगून – सहा महिन्यांपासून सैनिकांचा ताबा असलेल्या म्यानमारला सध्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लगात आहे. रोकड टंचाई भीषण जाणवत असल्याने नागरिकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून रांगेत उभे राहवे लागत आहे.Dangerous economic situation in Myanmar

रोकड कमी असल्याने अनेक तास उभारुनही काहींना पैसे मिळत नसल्याची स्थिती आहे. बँक आणि एटीएमची गर्दी कमी करण्यासाठी दररोज पैसे भरले जात आहेत, परंतु नागरिकांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या म्यानमारधील लोकांना दररोज ९ हजार रुपये प्रति व्यक्ती काढण्याची मुभा दिली आहे.



.म्यानमारधील आर्थिक संकटाचे परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत. रोकड कमी असल्याने खरेदी क्षमता कमी झाली आहे. व्यापारी देखील कामगारांना वेतन देऊ शकत नाहीत आणि कर्जदारांना देखील हप्ता भरता येत नसल्याचे दिसून येत आहे. म्यानमारचे चलन क्याट असून त्याचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत २० टक्के घसरले आहे.

म्यानमारमधील सत्ता उलथून टाकल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात ९४५ जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश नागरिकांचा मृत्यू हा सैनिकांच्या गोळीबारात झाला आहे. सैनिकांविरोधात ठिकठिकाणी बंड पुकारले जात असल्याने आर्थिक व्यवहार मंदावले आहेत. सैनिक शासकांनी ऑनलाइन पेमेंटवर बंदी आणल्याने आर्थिक संकट बळावले आहे. इंटरनेटही ठप्प पडल्याने नागरिकांना अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. म्यानमारमधील आर्थिक संकट लवकर दूर झाले नाही तर स्थिती चिंताजनक होऊ शकते.

Dangerous economic situation in Myanmar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात