बर्लिन – पॅरिस पर्यावरण परिषदेत जागतिक नेत्यांनी तापमानवाढ रोखण्यासाठीची निश्चिधत केलेली दीड अंशांची कमाल मर्यादा येत्या दशकभरातच ओलांडली जाण्याची शक्यता आहे.पृथ्वीवरील तापमानमान वाढीचा एकूण वेग पाहता पर्यावरण बदलाबाबतच्या समितीने (आयपीसीसी) आपल्या अहवालात याबाबत जाणीव करून दिली आहे. हा अहवाल म्हणजे मनुष्यासाठी ‘रेड अलर्ट’ असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.Global warming increased , red alert for humankind on earth
पर्यावरण बदलाचा धोका कमी करण्यासाठी औद्योगिकीकरणपूर्व काळातील सरासरी जागतिक तापमानाच्या तुलनेत सध्याचे तापमान दोन अंशांपेक्षा अधिक वाढता कामा नये, असा शास्त्रज्ञांनी इशारा दिला होता. २०१५ ला झालेल्या पॅरीस पर्यावरण परिषदेत सर्व जागतिक नेत्यांनी एकत्र येत ही तापमानवाढ दीड अंशांपेक्षा अधिक जाऊ न देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, ही मर्यादा आता येत्या काही वर्षांतच ओलांडली जाण्याची शक्यता आहे.
‘आयपीसीसी’चा हा तीन हजार पानी अहवाल जगभरातील २३४ शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. पर्यावरण बदलाचा वेग स्पष्ट करण्यासाठी अहवालात एक उदाहरण देण्यात आले आहे. पूर्वी ५० वर्षांतून एकदा येणारी उष्णतेची लाट आता दर दहा वर्षांनी येत आहे. तापमान आणखी एक अंशाने वाढल्यास अशा लाटा दर दोन वर्षांनी येऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App