विशेष प्रतिनिधी
लंडन – आर्थिक गैरव्यवहारप्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याचे भारतात हस्तांतर करण्याच्या बाजूने येथील न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध त्याला अपील करु देण्यास लंडन उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.Niraw modi can suicide also says his lawyer
मानसिक आरोग्य आणि मानवाधिकारांच्या मुद्द्यांवरून तो हे अपील करणार आहे. नीरव मोदी हा अत्यंत तणावाखाली असून या स्थितीत तो आत्महत्या करण्याचा धोका असल्याचे त्याच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. नीरवचे भारतात हस्तांतर झाल्यावर त्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवले जाणार आहे.
नीरवने येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यास ती रोखण्यास या तुरुंगातील यंत्रणा सक्षम असल्याबाबतही त्याच्या वकीलांनी शंका व्यक्त केली. यानंतर न्यायालयाने त्याला अपील करण्याची परवानगी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App