म्यानमारमध्ये लष्कराला विरोध करणाऱ्यांवर सुरक्षा दलाचे प्राणघातक हल्ले

विशेष प्रतिनिधी

यंगून : लष्करी उठावाला विरोध करणाऱ्या एका गटाच्या बंडखोरांवर सुरक्षा दलांनी घातक हल्ला केला. त्यात पाच बंडखोर मारले गेले. त्यामुळे या गटाला माघार घ्यावी लागली. Myanmar army attacks people once again

मिंदातमधील अराजकाबद्दल चिंता व्यक्त करून सुरक्षा दलांनी हिंसाचार थांबवावा असे आवाहन अमेरिका आणि ब्रिटनच्या वकिलातींतर्फे करण्यात आले.अमेरिकी वकिलातीने म्हटले आहे की, युद्धात वापरली जाणारी शस्त्रे सामान्य नागरिकांविरुद्ध वापरली जात आहे. यावरून लष्करी राजवट सत्ता कायम राखण्यासाठी किती टोक गाठेल हेच दिसून येते.

छीन या पश्चिमेकडील प्रांतामधील मिदात येथे बंडखोरांनी लष्कराला आव्हान दिले आहे. त्यांना हपाकांट येथील नागरीकांनी पाठिंबा दिला. लष्करी कायदेमंडळाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार गेली कित्येक दिवस चकमक सुरु आहे.

मिंदात येथे काही रहिवाशांनी एकत्र येत छीनलँड डिफेन्स फोर्सची स्थापना केली आहे. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, या आठवड्यात पाच सदस्य मारले गेले.

दहा पेक्षा जास्त सदस्य जखमी झाले, तर पाच जणांना अटक करण्यात आली.हा गट गावठी हत्यारांसह सुरक्षा दलांविरुद्ध लढत आहे. मिंदात येथे मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे.

Myanmar army attacks people once again

महत्त्वाच्या बातम्या