यूपीत स्कुटीवरून ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवणाऱ्या ‘सिलिंडरवाली बिटियॉं’ने जिंकले सर्वांचे मन…


विशेष प्रतिनिधी

लखनौ – ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. अशा वेळी उत्तर प्रदेशातील अर्शी नावाच्या तरुणीने आता इतर गरजू रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याची मोहीम हाती घेतली आहे.Young girl provides oxygen cylinder free at home

तिच्या या प्रयत्यांने राज्याच्या कानाकोपऱ्यातून कौतुक होत आहे. सर्वसामान्यांबरोबरच राजकारणीही तिचे याबद्दल कौतुक करत आहे.उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरमधील २६ वर्षीय अर्शीला कोरोनाग्रस्त वडिलांसाठी ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी संघर्ष करावा लागला.वडिलांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता तिने इतरांना मदत सुरु केली आहे.तिच्या वडिलांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागल्यानंतर डॉक्टरांनी सिलिंडरची व्यवस्था करण्यास सांगितले.

मात्र, वडिल गृहविलगीकरणात असल्याने तिला प्रशासनाकडून ऑक्सिजन सिलिंडर मिळू शकले नाही. अथक धडपडीनंतरही शहर दंडाधिकाऱ्यांकडून कसाबसा एक सिलिंडर मिळाला. त्यानंतर, उत्तराखंडमधल एका सामाजिक संस्थेला व्हॉट्‌स ॲपद्वारे संपर्क केल्यावर सिलिंडर मिळाला व वडिल कोरोनातून बरे झाले.

त्यानंतर, अर्शीने इतर गरजू रुग्णांना मदत करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे, ती उत्तर प्रदेशातील शहाबाद व हर्दोई तसेच उत्तराखंडमधीलही रुग्णांची ऑक्सिजनची गरज विनामूल्य भागवित आहे. त्यामुळे, रहिवाशांनी तिचे ‘सिलिंडरवाली बिटिया’ असे नामकरण केले आहे.

Young girl provides oxygen cylinder free at home

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण