जगातील निम्मे लसीकरण श्रीमंत देशांमध्येच, गरीब देशांत लशींचा मोठा तुटवडा

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : श्रीमंत देशांनी त्यांच्या नागरिकांना जवळपास ५० टक्के लसीकरण केले आहे. हे प्रमाण जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १६ टक्के आहे. म्हणजे मध्यम उत्पन्न आणि गरीब देशांमध्ये राहणाऱ्या ८४ टक्के लोकसंख्येला ५२ टक्के डोसवर अवलंबून राहावे लागत आहे.Vaccination only in rich countries

कोरोनाव्हायरसच्या लशीवरून जग दोन गटात विभागले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ज्यांच्याकडे लस आहे तो एक गट व ज्यांच्याकडे लस उपलब्ध नाही तो दुसरा गट आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अभ्यासानुसार या फरकामुळे कोरोनाची जागतिक साथ आणखी तीव्र होऊ शकते.



‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अभ्यासातील माहितीनुसार व १९ एप्रिलपर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार इस्राईलमधील ६० टक्के लोकसंख्येने लशीचा पहिला डोस घेतला आहे. ५८ टक्के जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

इस्राईलने सरासरीपेक्षा जास्त पैसे देऊन नागरिकांचे लसीकरण केले आहे. आरोग्याशी संबंधित माहितीही इस्राईलने औषध कंपन्यांना देऊन लवकरात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत पाच हजार ९१० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च झाले आहेत.

Vaccination only in rich countries

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात