गरीब घाना देशाला अखेर मिळाली कोरोनावरील लस, संयुक्त राष्ट्रांच्या लसीकरणातील महत्वाचा टप्पा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – जगातील गरीब देशांपर्यंतही कोरोना प्रतिबंधल लस पोहोचावी, यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सुरु केलेल्या ‘कोव्हॅक्स’ या सुविधेमार्फत लशीचा पहिला साठा आफ्रिकेतील घाना या देशाला मिळाला आहे. Ghana gets doses in COVAX program

कोव्हॅक्सतर्फे या देशाला भारतातील सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ॲस्ट्राझेनेका लशीचे साठ हजार डोस देण्यात आले.घानामध्ये ‘युनिसेफ’मार्फत लस वितरण केले जाणार आहे. ‘कोव्हॅक्स’मार्फत सर्वप्रथम गरीब आणि अल्पउत्पन्न गटातील देशांना लस पुरवठा केला जाणार आहे. या अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ९२ देशांमध्ये घानाचा समावेश आहे. तीन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात ८१ हजार कोरोनाबाधित असून ५८४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. येथे आता लस पोहोचल्याने दोन मार्चपासून लसीकरण सुरु होणार आहे.

घानाला लस पोहोचल्याने आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या लस खरेदी आणि वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ‘कोव्हॅक्स’मार्फत या वर्षभरात दोन अब्ज लशींचा जगभरात पुरवठा करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा उद्देश आहे. जगातील अनेक श्रीमंत देशांनी त्यांच्या लोकसंख्येला आवश्यशक असल्यापेक्षा कितीतरी अधिक लशी खरेदी केल्या आहेत.

Ghana gets doses in COVAX program

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*