बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका


विशेष प्रतिनिधी

पाटणा – गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बिहारची राजधानी पाटणामध्ये जवळपास तीन लाख लोकांना फटका बसला आहे. पुरामुळे ४३ गावांमधील जनजीवन पूर्ण विस्कळित झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.Flood worsens in Bihar

मुसळधार पावसामुळे गंगा नदीने धोक्याची पातळी ९ ऑगस्टलाच ओलांडली होती. पाटणा शहरात या पुराचे पाणी येऊ नये म्हणून येथील फराक्का बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दानापूर, मानेर आणि बख्तीयारपूर या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.



नागरिकांच्या बचावासाठी २५९ लहान बोटींद्वारे स्थानिकांना येथून बाहेर काढण्यात येत आहे. त्यांनतर मदत शिबिरांमध्ये त्यांची राहण्याची सोय केली जात असून कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांना अन्न पुरवले जात आहे.विशेष म्हणजे पूरस्थितीतही लसीकरणाचे काम केले जात आहे. पूरग्रस्त भागात आरोग्य कर्मचारी बोटींनी जात नागरिकांचे लसीकरण करत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

Flood worsens in Bihar

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात