वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या तुरुंगातील हजारो कैद्यांना तालिबानने मुक्त केलं आहे. यामध्ये ‘इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया आणि ‘अल-कायदा’च्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. Five thousand terrorists released from Kabul prison; The Taliban dominates Afghanistan
तालिबानने रविवारी राजधानी काबूल ताब्यात घेतली. तसेच अफगाणिस्तावर तालिबानने जवळजवळ संपूर्ण कब्जा केला आहे. अमेरिका आणि नाटो फौजा मागे घेण्यास सुरुवात झाली असून सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनीआठवडाभरात संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. रविवारी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केले आहे.
अफगाणिस्तान सरकारने बाग्राम एअरबेस तालिबानच्या ताब्यात दिला. या ठिकाणी पुल-ए-चाकरी तुरुंग आहे. या तुरुंगात पाच हजार कैदी आहेत. तालिबानने यावर ताबा मिळवल्यानंतर सर्व कैद्यांना सोडून दिलं आहे. तुरुंगात सर्वाधिक कैदी हे अलकायदा आणि तालिबानी दहशतवादी होते. एका फुटेजमध्ये तालिबानी दहशतवादी कैद्यांना सोडून देत असल्याचं दिसत आहे. तुरुंगामधून गोळीबाराचे आवाज आल्याचंही बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more