विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) काही लोकप्रिय मद्य उत्पादनांबाबत नियमभंगाची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ओल्ड मॉंक, मॅकडॉवेल्स, बॅगपायपर, अँटिक्विटी ब्लू आणि रॉयल चॅलेंज या ब्रँड्सच्या काही विशिष्ट उत्पादनांवर आणि उत्पादन केंद्रांवर कारवाई करण्यात आल्याच्या वृत्तामुळे मद्यप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे.
कृत्रिम फ्लेवर्स आणि लेबलिंगबाबत आक्षेप
मिळालेल्या माहितीनुसार, FSSAI च्या तपासात काही मद्य उत्पादक कंपन्यांकडून रम आणि व्हिस्कीमध्ये कृत्रिम फ्लेवर्सचा वापर करून ती उत्पादने ‘स्टँडर्ड अल्कोहोलिक ड्रिंक’ म्हणून विकली जात असल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या उत्पादनांच्या लेबलवर अशा घटकांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आक्षेपही नोंदविण्यात आला आहे.
याशिवाय काही उत्पादनांवर ‘रम’, ‘व्हिस्की’ किंवा ‘7 Years Old’ यांसारखे दावे करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात त्यामध्ये न्यूट्रल स्पिरिटचा मोठ्या प्रमाणावर वापर करून मर्यादित प्रमाणात मॅच्युअर्ड रम किंवा व्हिस्की मिसळली जात असल्याचे तपासात निदर्शनास आल्याचे सांगितले जात आहे. या माहितीचा लेबलवर स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे गुणवत्ता निकषांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
ओल्ड मॉंकच्या संपूर्ण ब्रँडवर बंदी नाही
दरम्यान, FSSAI ने ओल्ड मॉंकच्या संपूर्ण ब्रँडवर बंदी घातलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ काही विशिष्ट उत्पादनांवर आणि ठराविक उत्पादन केंद्रांमधून तयार झालेल्या व्हेरियंट्सवरच कारवाई करण्यात आली आहे.
नियमांनुसार आवश्यक बदल करून संबंधित कंपन्यांनी अनुपालन पूर्ण केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे FSSAI ने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App