फक्त पुतण्या मुलगी नातवाचे नातवाला मोठे करणाऱ्या शरद पवारांचे ओबीसी प्रेम अचानक उफाळलेय; गोपीचंद पडळकर रांचे शरसंधान


प्रतिनिधी

मुंबई : उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठे केलेत आणि जेव्हा सत्तेचा भाग बनलात तेव्हा मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण हाणून पाडलेत, अशा शेलक्या शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. Sharad Pawar’s Love For Obcs Has Suddenly Erupted Today; targets BJP MLC Gopichand Padalkar

शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्रातल्या मोदी सरकारवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्या संदर्भात टीकास्त्र सोडले होते. त्याला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला त्यावर सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू झाली त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले

पडळकर म्हणाले, की शरद पवार यांचे ओबीसी प्रेम अचानकपणे आज उफाळून आलै आहे. ते कुठलीही कामे हेतूशिवाय करत नाहीत आणि खरा हेतू कधी दाखवतही नाहीत. पण मला त्यांना एकच सांगायचे आहे. केंद्राने ताट वाढल हे खरे आहे. तुमचे हात बांधले गेले आहेत तेही खरे आहे. पण हे हात कुणामुळे बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पई पावण्यांच्या प्रेमामुळे? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठे केलेत. आणि जेव्हा आपण सत्तेचा भाग बनलात, तेव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले, अशा शब्दांमध्ये आमदार पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

जो २०११ सालचा सेन्सस अहवाल तुम्ही आता मगाताय त्यातला घोळ तुम्ही सहभागी असलेल्या डॉ. मनमोहनसिंग सरकारनेच घातला आहे. भागीदारी तुमची, पाप तुमचे आणि बोंबा मात्र मोदी सरकारच्या नावाने ठोकायच्या.. मला जातीवादी विष पसरवणाऱ्यांना हेच विचारायचे आहे, तुम्हाला जात निहाय जनगणनेचा डेटा कशाला हवाय?, असा सवाल देखील पडळकरांनी केला आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरिता तुम्हाला इंपेरिकल डेटा द्यायचाय आणि मराठा आरक्षणाबाबात आपण अजून त्यांना मागासलेले सिद्ध करण्याची कोणतीही प्रक्रियाच सुरू केलेली नाही. नुसत्या भुलथापा मारायच्या आणि लोकांचे लक्ष विचलीत करायचे, ही प्रस्थापितांची करामत बहुजनांना कळाली आहे. जे मराठा आरक्षणाबाबत बोलताना नेहमी पळ काढत होते, अशा शरद पवारांनांच आज भूमिका मांडायला लागतेय.. हाच आमच्या बहुजनांचा प्रस्थापितांविरोधतला पहिला विजय आहे, असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला.

Sharad Pawar’s Love For Obcs Has Suddenly Erupted Today; targets BJP MLC Gopichand Padalkar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात