Ind vs Eng : मैदानावर जमके करेंगे राडा ! आता भर मैदानात भिडले बुमराह आणि बटलर ; पाहा व्हिडीओ


इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने दमदार भागिदारी करत भारताचा डाव सावरला. यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी गोलंदाजीच्या आक्रमणासोबत शाब्दिक आक्रमणंही केली.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड कसोटीच्या अखेरच्या दिवसापर्यंत भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमधले वाद थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अखेरच्या दिवशी इंग्लंडचा विकेटकिपर जोस बटलर आणि भारताच्या जसप्रीत बुमराहमध्ये मैदानात वादावादी झाली.बुुमराहने चांगलाच चोप दिला.

दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसापासूनच दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. असाच काहीसा प्रकार सामन्यातील पाचव्या दिवशी देखील पाहायला मिळाला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघ फलंदाजी करत असताना मार्क वुडच्या ९२ व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. बुमराह आणि बटलर यांच्यात शाब्दीक वाद झाला ज्यातून बुमराहने बटलरला हळू बॉल टाक म्हणून मी तक्रार करत नव्हतो असं सुनावलं. स्टम्प माईकमध्ये हा आवाज रेकॉर्ड झाला आहे.Ind vs Eng: Rada on the field! Bumrah and Butler are now on the field; Watch the video

यावेळी मैदानातील अंपायर्सही या भांडणात वेळेत हस्तक्षेप करत दोघांनाही वेगळं केलं. परंतू इंग्लंडचा बॉलर मार्क वुड बुमराहला उद्देशून आपला राग काढतच होता. बुमराहने मार्क वुडच्या बॉलिंगवर खणखणीत चौकार लगावत त्याला प्रत्युत्तर दिलं. ज्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या विराट कोहलीचाही संताप अनावर झालेला पहायला मिळाला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने बाऊन्सर बॉल टाकून जेम्स अँडरसनला हैराणं केलं होतं. ज्यानंतर दोघांमध्ये छोटासा वाद झाला. या वादाचे पडसाद शेवटच्या दिवसापर्यंत मैदानावर उमटताना पहायला मिळाले.

बुमराह आणि शमीने इंग्लिश गोलंदाजांना दिला चोप
या चकमकीनंतर बुमराहने वूडसह पूर्ण इंग्लंड संघाचा घाम काढला. भारतीय संघातील मुख्य फलंदाज लवकर माघारी परतल्यानंतर ५ व्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय गोलंदाजांनी फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी मिळून लंचपर्यंत भारतीय संघाला २८६ धावांपर्यंत पोहचवले आहे. मोहम्मद शमी नाबाद ५२ तर जसप्रीत बुमराह नाबाद ३० धावांवर फलंदाजी करत आहे. भारतीय संघाने २५९ धावांची आघाडी घेतली आहे.

  1. Ind vs Eng: Rada on the field! Bumrah and Butler are now on the field; Watch the videos.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*