वृत्तसंस्था
चंदिगड : पंजाब मध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना भाजपने जोरदार धक्का दिल आहे. चन्नी यांचे चुलत भाऊ जसविंदर सिंग धालीवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी एकट्यानेच नव्हे तर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे माजी अध्यक्ष गुरुचरण सिंग तोहरा यांचे नातू कवरजित सिंग तोहरा याखेरीज आमदार अरविंद खन्ना चंडीगड Charanjit Singh channi’s brother enter in BJP with Gurucharan Singh Tohara’s grandson
महापालिकेचे सदस्य गुरु शरण सिंग गोषा या महत्त्वाच्या नेत्यांनी घेतली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासमवेत सुमारे 60 कार्यकर्त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. भाजपचे पंजाब प्रदेश प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांनी या सर्व नेत्यांचे स्वागत केले आहे.
हिंदी प्रसारमाध्यमांनी जसविंदर सिंग धालीवाल यांच्या पक्ष प्रवेशाच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर दिल्या असल्या तरी राजकीय दृष्ट्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्यापेक्षा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे माजी अध्यक्ष गुरुचरण सिंग तोहरा यांचे नातू कवरजित सिंग तोहरा यांचा प्रभाव अधिक आहे.
Jaswinder Singh Dhaliwal, cousin brother of Punjab CM Charanjit Singh Channi joins the Bharatiya Janata Party in the presence of Union Minister Gajendra Singh Shekhawat in Chandigarh today pic.twitter.com/JHAeadgO1C — ANI (@ANI) January 11, 2022
Jaswinder Singh Dhaliwal, cousin brother of Punjab CM Charanjit Singh Channi joins the Bharatiya Janata Party in the presence of Union Minister Gajendra Singh Shekhawat in Chandigarh today pic.twitter.com/JHAeadgO1C
— ANI (@ANI) January 11, 2022
गुरुचरण सिंग तोहरा हे पंजाब मधल्या अकाली राजकारणातले महत्त्वाचे नेते मानले जायचे. पंजाब कराराच्या वेळचे अकाली नेते हरचरण सिंग लोंगोवाल यांचे गुरुचरण सिंग तोहरा हे सहकारी होते. लोंगोवाल आणि तोहरा या दोन्ही नेत्यांचा पंजाबच्या राजकारणावर फार मोठा प्रभाव राहिला आहे. तोहरा यांचे नातू कवरजित सिंग तोहरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तोहरा यांच्या प्रभावक्षेत्रात भाजपला शिरकाव करता येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App