आम आदमी पार्टीचा पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पुढच्या आठवड्यात जाहीर


वृत्तसंस्था

चंदीगड : आम आदमी पार्टीचा पंजाबचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पुढच्या आठवड्यात जाहीर करू, अशी महत्वपूर्ण घोषणा आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ते आज पंजाब दौऱ्यावर आहेत. चंदीगड मध्ये पत्रकारांशी विमानतळावर ते बोलत होते.Aam Aadmi Party’s Punjab chief ministerial candidate announced next week

पंजाब मध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठीक करणे त्याचबरोबर युवकांना रोजगार उपलब्ध करणे या दोन मुद्द्यांवर आम आदमी पार्टी भर देऊन निवडणूक लढवत आहे, असे सांगून अरविंद केजरीवाल म्हणाले की पंजाबची कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडली आहे. आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर सर्वांना सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे याला प्राधान्य दिले जाईल. पंतप्रधान असोथ किंवा अन्य सामान्य नागरिक सर्वांसाठी पंजाब मध्ये सुरक्षित वातावरण असेल याची काळजी आम आदमी पार्टीचे सरकार घेईल. कोणाच्याही सुरक्षाव्यवस्थेत कुचराई होणार नाही. पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल हे पुढच्या आठवड्यात जाहीर करू, असेही अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

फिरोजपुर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळली. तिचे उल्लंघन झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसह सर्व नागरिक सुरक्षित राहतील असे वातावरण पंजाब मध्ये निर्माण करण्याचे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

Aam Aadmi Party’s Punjab chief ministerial candidate announced next week

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात