अभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण , इन्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती


मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकांपासून ते मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते- अभिनेत्रींना कोरोनाची लागण होत असलेली पाहायला मिळत आहे.Actress Neha Pendsela posted the information about Corona infection on Instagram


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकांपासून ते मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते- अभिनेत्रींना कोरोनाची लागण होत असलेली पाहायला मिळत आहे.दरम्यान अभिनेत्री नेहा पेंडसेलाही कोरोनाची लागण झाली आहे.सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली आहे.

पोस्टमध्ये नेहा म्हणाली की ,” मला सौम्य लक्षणं जाणवत असल्याने मी कोरोना चाचणी केली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.मी सध्या होम क्वारंटाईन आहे.घरात राहुनच मी सध्या उपचार घेतेय.त्यामुळे मी सध्या शुटिंग करत नाहीये,असं नेहाने आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.नेहाला मागच्या काही दिवसांपासून सौम्य लक्षणं असल्यामुळे तिने आपली चाचणी करून घेतली.दोनदा तिची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र तिसऱ्यांदा चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.

Actress Neha Pendsela posted the information about Corona infection on Instagram

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण