औरंगाबाद : कोरोना रुग्णांना अवाढव्य बिल आकारणाऱ्या हॉस्पिटलविरोधात नोटीस , महापालिकेकडून कारवाई


संबंधित 12 रुग्णालयांना नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.Aurangabad: Notice against hospital charging huge bills to Corona patients, action taken by Municipal Corporation


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना अवाढव्य बिल लावले गेले होते. दरम्यान ज्या ज्या रुग्णालयांनी जास्त बिल लावले त्या रुग्णालयांविरोधात औरंगाबाद महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाकडून विविध रुग्णालयांची तपासणी ऑडिटरमार्फत करण्यात आली होती.

दरम्यान अतिरिक्त बिल घेतलेल्या रुग्णालयांची यादी महापालिकेला प्रशासनाकडून प्राप्त झाली. त्यानुसार, संबंधित 12 रुग्णालयांना नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.



 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होत होती.त्यामुळे बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती.अशा स्थितीत बेड्स मिळणे कठीण होते.जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून किती बिल आकारावे, यासंबंधीचे नियम ठरवून दिले होते.मात्र हे नियम धाब्यावर बसवत काही रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात बिलांची वसुली केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.

Aurangabad: Notice against hospital charging huge bills to Corona patients, action taken by Municipal Corporation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात