पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रांच्या नेतृत्वाखालील समिती चौकशी आणि तपास करणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात फिरोजपूर मध्ये मोठी त्रुटी आढळली. सुरक्षेचे उल्लंघन झाले. याविषयी सुप्रीम कोर्टाने आधी जाहीर केल्याप्रमाणे स्वतंत्र तपास समिती नेमली असून तिचे नेतृत्व सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा यांच्याकडे देण्यात आले आहे. Error in PM’s security: Committee headed by retired Supreme Court Justice Indu Malhotra to probe

न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील समितीत राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएचे महासंचालक तसेच पंजाब पोलीस महासंचालक आणि पंजाब – हरियाणा हायकोर्टाचे निबंधक यांचा समावेश असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत नेमकी कोणती त्रुटी आढळून आली, त्याची कारणे काय?, त्यासाठी कोणत्या व्यक्ती जबाबदार आहेत? याच्या निश्चितीचे काम समितीने करायचे आहे. त्याच बरोबर यापुढे पंतप्रधानांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी राहता कामा नयेत. यासाठी कोणत्या ठाम उपाययोजना करता येतील?, त्यासंदर्भात सूचनाही करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली ही चौकशी होणार आहे.

याआधी केंद्र आणि पंजाब सरकार यांनी या सर्व प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करायला सुरुवात केली होती. ती चौकशी सुप्रीम कोर्टाने थांबवायला सांगितली आहे. त्यानंतरच इंदु मल्होत्रा यांची समिती प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या संपूर्ण निगराणीखाली स्वतंत्रपणे ही समिती पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबद्दल चौकशी आणि तपास करणार आहे.

Error in PM’s security : Committee headed by retired Supreme Court Justice Indu Malhotra to probe

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात