AURANGABAD : महाराष्ट्रातील अनेक भागात गारपीट; शेतकरी हवालदिल:औरंगाबाद-अकोला-अहमदनगर-वाशिम-गोंदियाला तडाखा


गारपिटीमुळे शेतमालाचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज.

नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली. ढगाळ वातावरण तसेच पावसामुळं हवेत गारठा निर्माण झाला. यामुळं पिकांचं नुकसान होत आहे.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद:आज राज्यातील काही भागात मुसळधार पावसासह गारपीट झाली.हवामाने विभागाने आधीच अंदाज व्यक्त केला होता .मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील वाशिम, तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा पिकांना फटका बसला असून, मोठं नुकसान झालं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाआहे.AURANGABAD: Hailstorms hit several parts of Maharashtra;Aurangabad,Akola-Ahmednagar-Washim hit

K S Hosalikar (@Hosalikar_KS) Tweeted:
वेस्टर्न डिस्टर्बन्स व संबंधित वरच्या हवेच्या सायसरचा प्रभावाने, 28-30Dec,मध्य प्रदेश,विदर्भ,छत्तीसगडमध्ये हलका-मध्यम, तुरळक ते काही ठिकाणी पाउस.

28Dec प.मध्य प्रदेश,विदर्भ,झारखंड गडगडाटासह पाउस,गारपीट शक्यता.
मध्य भारतात काही ठिकाणी 2 दिवसांनी किमान तापमान 2-4°C घसरण्याची शक्यता https://t.co/E7qKFN9z4M https://twitter.com/Hosalikar_KS/status/1475737591269920768?s=20

विदर्भात देखील हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारपिटीनंही तडाखा दिला. यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पिकांचे नुकसान झाले. आता पंचनामे होणार काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ झारखंड राज्यांमध्ये 28 ते 30 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात आज मुसळधार पावसासह गारपीट झाली.

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात गारांसह पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार गारपीट झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोराच्या गारांसह पाऊस झाला. गोदावरी नदीच्या काठावरील गावांना याचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गारपीट आणि वादळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू हरबरा पिकांना फटका बसला असून, अचानक झालेल्या गारपीटीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

AURANGABAD: Hailstorms hit several parts of Maharashtra; Aurangabad,Akola-Ahmednagar-Washim hit

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात