विशेष प्रतिनिधी
डोंबिवली : मुंबईमधील डोंबिवली येथील पूर्व भागातील श्री दत्तकृपा ही 5 मजली इमारत वादग्रस्त ठरली होती. महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम असल्याचा आरोप करत या इमारतीला बेकायदा घोषित केले होते. 1970 पासून या जागेवर इमारत होती. ही इमारत धोकादायक असल्याने येथे राहणार्या 40 कुटुंबियांनी मिळून ही इमारत पाडून तेथे नवीन बांधकाम करण्यास सुरूवात केली. ह्या बांधकामाची सुरूवात झाल्यानंतर बांधकाम विभाग आणि विभागाने ही इमारत बेकायदा घोषित करून बांधकाम करण्यास मनाई केली होती.
KDMC’s action on illegal building in Dombivali! 40 families became homeless, were the officials asleep when the construction of the building started? The question of angry citizens
पण त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी येथे बांधकाम करण्यास सुरूवात झाली. तर आता इमारतीवर केडीएमसीने कारवाई केली आहे. केलेल्या या कारवाईमुळे तेथे राहणारे 40 कुटुंबीय आता बेघर झालेले आहेत. प्रशासनाच्या या कारवाईवर तेथील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कोणतीही नोटीस आधी देण्यात आली नाही असे देखील ह्या नागरिकांनी सांगितले आहे.
There is no illegal construction in my house
जेव्हा इमारतीचे बांधकाम केले जात होते, तेव्हा हे अधिकारी झोपले होते का? असा संतप्त सवाल बेघर झालेल्या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. तर येथील प्रभाग अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आता कारवाई सुरू आहे. संपूर्ण कार्यवाही झाल्यानंतर यासंबंधी सविस्तर माहिती देऊ. या इमारतीचे काम सुरु होते तेव्हा अधिकारी कुठे होते? याचे उत्तर देणे मात्र रत्नप्रभा कांबळे यांनी टाळले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App