मेंदूचा शोध व बोध : मानवाच्या मेंदूचे वजन नेमके असते तरी किती


मेंदू मऊ, जेलीप्रमाणे असून त्याभोवती असलेल्या कवटीमुळे त्याचे संरक्षण होते. प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन तेराशे ते चौदाशे ग्रॅम म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या सुमारे दोन टक्के असते. मानवी मेंदू हा जगातील सर्व प्राण्यामध्ये प्रगत मेंदू मानला जातो. साऱ्या मानवी शरीराचे नियंत्रण मेंदूद्वारेच केले जाते. त्यामुळे मेंदूला अनन्यसाधारण असे महत्व आहे यात शंकाच नाही. मेंदू हा मानवी चेतासंस्थेचे इंद्रिय आहे.Exactly how much the human brain weighs

मेंदू आणि मेरुरज्जू मिळून मध्यवर्ती चेतासंस्था बनते. मेंदू हा चेतापेशी, सहयोगी पेशी व रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो. प्रौढ मानवी मेंदूत सुमारे ८६ अब्ज चेतापेशी असतात आणि जवळजवळ तेवढ्याच सहयोगी पेशी असतात. पुरुषाच्या मेंदूचे आकारमान सुमारे १२६० घन सेंटीमीटर, तर स्त्रीच्या सुमारे ११३० घन सेंटीमीटर असते. अन्य सस्तन प्राण्यांची तुलना केल्यास असे दिसून येते की मानवी मेंदू आकारमानाने आणि वजनाने चिंपँझीच्या मेंदूच्या तिप्पट असतो.

हत्तीच्या मेंदूचे वजन सुमारे पाच किलो ग्रॅम असते. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या मेंदूप्रमाणे मानवाच्या मेंदूचेही अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिष्क व पश्चमस्तिष्क म्हणजेच फोरब्रेन, मिडब्रेन व हाइंड ब्रेन असे तीन भाग आहेत. मानवाच्या अग्रमस्तिष्काचे आकारमान इतर प्राण्यांच्या तुलनेने मोठे असते. अग्रमस्तिष्कामध्ये सेरेब्रम, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस यांचा समावेश केला जातो. पश्चमस्तिष्कामध्ये सेरेबेलम आणि ब्रेन स्टेम यांचा समावेश केला जातो. मस्तिष्क स्तंभ हा अनुमस्तिष्क सेतू आणि मस्तिष्क पुच्छ यांनी बनलेला असतो.

प्रमस्तिष्क, मस्तिष्क स्तंभ, अनुमस्तिष्क आणि मेरुरज्जू यांवर तीन मस्तिष्कावरणे असतात. सर्वांत बाहेरील कठीण आवरण, दृढ आवरण किंवा दृढतानिका, मधले आवरण, जाल आवरण किंवा जालतानिका आणि सर्वांत आतील व नाजुक आवरण, मृदु आवरण किंवा मृदुतानिका. जाल आवरण आणि मृदू आवरण यांच्या दरम्यान सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतो. मेंदूच्या वेगवेगळ्या भागांच्या दरम्यान पोकळ्या म्हणजे मस्तिष्कनिलया असतात. मस्तिष्कनिलयांमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतो.

Exactly how much the human brain weighs

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात