विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात झालेल्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे. तर या मागणीनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर कडाडून टीका केली आहे.
Rajput and Dabholkar cases are also with the CBI. What happened to them? The state government is investigating the Paper leak case; Rohit Pawar
रोहित पवार म्हणतात, रजपूत आणि दाभोळकर केस देखील सीबीआय कडेच आहेत. त्यांचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी म्हटले की राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
TET EXAM Paper leak :टीईटी पेपरफुटी प्रकरण – थेट जालना कनेक्शन! प्राध्यापकाची ऑडिओ क्लिप-पुणे क्राईम ब्रँच वाटूरात
पुढे ते म्हणतात की, महापोर्टल भाजपच्या काळामध्ये झालेले आहे. घोटाळा उघडकीस आहेसच. हे सगळे धागेदोरे भाजपच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी हा तपास सीबीआयकडे दिला जावा अशी मागणी केली आहे. जेणेकरून या सर्व प्रकरणावर केंद्र सरकारचे नियंत्रण राहील. अशी टीका रोहित पवार यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केलेला आहे.
या हल्ल्याबाबत आपले मत व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक आमदाराला सुरक्षा दिली जाते. आमदार पडळकरांनी ही सुरक्षा घेतली नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आणि ही घटना घडून बरेच दिवस झालेले आहेत. पण आता या घटनेचे व्हिडिओ समोर येत आहेत. असे का? असा खोचक प्रश्न देखील रोहित पवार यांनी यावेळी मांडला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App