लालूंच्या जंगलराजची परंपरा पुत्र तेजप्रतापकडून कायम, कुख्यात गुन्हेगाराच्या पत्नीला बनविले विधायक प्रतिनिधी


विशेष प्रतिनिधी

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाच्या कारकिर्दीत लालूप्रसाद यादव यांनी गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिला. त्यांच्याच काळात अनेक गुन्हेगार राजकारणात येऊन पावन झाले. त्यांचीच परंपरा आता पुत्र तेजप्रताप यादव यांनी चालविली आहे.The tradition of Lalu’s Jungle Raj is perpetuated by his son Tejpratap, who made the wife of a notorious criminal a constructive representative

समस्तीपूर-खगरिया भागातील कुख्यात गुन्हेगार अशोक यादव याची पत्नी विभादेवी यांना आपले विधायक प्रतिनिधी म्हणून नेमल्याने वाद निर्माण झाला आहे.तेजप्रताप यांनी एक ट्विट करून विभादेवी यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.



राजद नेता विभादेवी यांना आपण विधायक प्रतिनिधी म्हणून नेमणूक दिली असून त्या आपल्या कर्तव्याचे पूर्ण निष्ठेने पालन करतील, अशी मी अशा करतो. तसेच त्यांना त्यासाठी शुभेच्छा देतो.समस्तीपूर जिल्ह्यातील बिथान येथील रहिवासी असलेल्या अशोक यादव याच्याविरुद्ध हत्या, हत्येचे प्रयत्न आणि स्फोटकांची खरेदी विक्री यांसह विविध आरोपांखाली २६ गुन्हे दाखल आहेत.

ईडीने त्याची १० कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे.अशोक यादव याच्या पत्नीला प्रतिनिधी केल्याबद्दल भाजपने तेजप्रताप यांच्यावर टीका केली आहे. राजदने नेहमीच गुन्हेगारांना संरक्षण दिले आहे. हीच परंपरा तेजप्रताप यादव पुढे चालवित आहेत.

लोकांना घाबरविण्यासाठी गुन्हेगाराच्या पत्नीला विधायक प्रतिनिधी बनविले आहे, असे भाजप प्रवक्ता प्रेमरंजन पटेल यांनी म्हटले आहे.राष्ट्रीय जनता दलाने वेगळेच तर्कट मानत भाजप महिलांचा सन्मान करत नाही. विभादेवी यांच्यावर आरोप कोठे आहेत, असा सवाल केला आहे.

The tradition of Lalu’s Jungle Raj is perpetuated by his son Tejpratap, who made the wife of a notorious criminal a constructive representative

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात