मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वाद, प्रकरणाची सुनावणी पूर्ण; शाही ईदगाहच्या सर्वेक्षणासह सर्व १६ याचिकांवरील निर्णय राखीव

वृत्तसंस्था

प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मयंककुमार जैन यांच्या खंडपीठाने लखनाै, मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी वादाशी संबंधित सर्व १६ याचिकांवर सुनावणी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला. अधिवक्ता आयुक्तांमार्फत परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश द्यायचा की १९९१ च्या धार्मिक स्थळ कायद्यांतर्गत खटल्याची सुनावणी आधी करायची हे कोर्टाला ठरवायचे आहे. Srikrishna Janmabhoomi dispute in Mathura, case hearing completed; Reserve decision on all 16 petitions including survey of Shahi Eidgah



हायकोर्टाच्या निर्देशानुसार, उच्च न्यायालय एकाच वेळी मथुरा जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या १६ याचिकांवर सुनावणी करत आहे. या याचिकांत शाही ईदगाह मशीद, यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा संघ व श्रीकृष्ण जन्मभूमी संघ हे पक्षकार आहेत. अधिवक्ता विष्णू शंकर जैन म्हणाले, श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी अधिवक्ता आयुक्तांनी दाखल केलेल्या अर्जावर हायकोर्टाने सुनावणी पूर्ण केली.

…तर याचिकेवर निर्णय घेऊ नये

सुनावणीदरम्यान शाही ईदगाह मशिदीच्या वतीने वकील म्हणाले, धार्मिक स्थळ कायदा १९९१ आणि वक्फ कायद्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वेक्षण याचिकेवर निर्णय घेऊ नये. ज्ञानवापी प्रकरणाचा संदर्भ देताना जैन म्हणाले, तेथे प्रथम कोर्ट कमिशनरची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर धर्मस्थळ कायदा लागू करण्याचे आदेश देण्यात आले.

Srikrishna Janmabhoomi dispute in Mathura, case hearing completed; Reserve decision on all 16 petitions including survey of Shahi Eidgah

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात