आनंद दिघेंचा उल्लेख केलेली ती पोस्ट चर्चेत!
विशेष प्रतिनिधी
पुणे : अभिनेता प्रसाद ओक मराठी मनोरंजसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनयाबरोबरच प्रसाद एक उत्तम दिग्दर्शकही आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने दिग्दर्शित केलेला ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट प्रदर्शित झाला. Prasad oak social media post
या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. भाऊबीजेनिमित्त प्रसादने आनंद दिघेंवर आधारित एक पोस्ट शेअर केली आहे.
भाऊबीजेनिमित्त प्रसादने आपल्या इन्स्टाग्रामवर ए
View this post on Instagram A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)
A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)
क पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या लूकमधला त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर प्रसादने दिलेली कॅप्शनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. फोटो पोस्ट करीत त्याने लिहिलं, “भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा. प्रत्येक बहिणीच्या पाठीशी आनंद दिघेंसारखा भाऊ असावा.” प्रसाद ओकची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App