लोकसभेच्या जागा वाटपात ठाकरे – पवार परस्पर राजी; पण काँग्रेस पंक्चर करणार महाविकास आघाडीची गाडी!!

loksabha election candidate thackeray pawar and congress

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र या जागावाटपात ठाकरे आणि पवार परस्परच राजी झाले आहेत, त्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले असून काँग्रेसला “योग्य आणि न्याय्य” जागावाटपा विषयी शंका आहे. loksabha election candidate thackeray pawar and congress

त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीची गाडी पंक्चर करायच्या बेतात आहे काँग्रेसने “न्याय्य पद्धतीने” जागावाटप करण्याचा आग्रह धरला आहे.

मूळात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राजकीय शक्ती आता घटली आहे. कारण त्या त्यांच्या पक्षांमध्ये फूट पडून मोठ्या प्रमाणावर आमदार खासदार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर निघून गेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत पवार – ठाकरेंची ताकद मतदारांमध्ये देखील घटल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचे स्थान पहिल्या नंबरवर आल्याचा पक्षाच्या नेत्यांचा होरा आहे. त्यामुळे काँग्रेसने आता महाविकास आघाडीत पहिल्या नंबरचा वाटा मागितला आहे.


काँग्रेसने स्वतःच्याच सर्व्हेत महाविकास आघाडीला 45 जागा देणे म्हणजे आरशाला मेकअप करून त्याच्यासमोर उभे राहणे!!


लोकसभेसाठी काँग्रेसला ठाकरे आणि पवार गटापेक्षा जास्त जागा मिळाव्यात असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. 5 राज्यांच्या निवडणूक निकालांचा कल काँग्रेसच्या बाजूने असल्याचा अंदाज अनेक सर्व्हेंमधून वर्तवण्यात आला आहे. त्याच्याच जोरावर बार्गेनिंग पॉवर वाढली असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. या निवडणुका नंतर काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पण हा दावा पवार आणि ठाकरे गटाला मान्य नसल्याने काँग्रेस एका बाजूला आणि ठाकरे – पवार एका बाजूला असे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान काँग्रेसने आपल्या ताज्या बळानुसार जागांची मागणी केली गेली असली तरी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटप आधीच झाले असल्याचा दावा पवार गटाने केला आहे. प्राथमिक चर्चेनुसार, महाविकास आघाडीत लोकसभेला ठाकरे गट 19 ते 21 जागा, काँग्रेस 13 ते 15 जागा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 10 ते 12 जागा लढवू शकते. मात्र, या संभाव्य फॉर्म्युल्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त करून आपल्याकडे अधिक जागा खेचून घेण्याची तयारी चालवली आहे.

महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आल्यामुळे आधीच प्रत्येक पक्षाला थोडंफार ऍडजेस्ट करावे लागत आहे. त्यामुळेच लोकसभेसाठी काँग्रेसला अतिरिक्त जागा देण्यास पवार – ठाकरेंचा विरोध असल्याची चर्चा आहे. जागावाटपात एकमत झाले नाही, तर काँग्रेस स्वबळावर आणि ठाकरे – पवार एकत्र लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

loksabha election candidate thackeray pawar and congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात