Axis Bank वर RBI ची मोठी कारवाई; 90 लाखांपेक्षा अधिक दंड ठोठावला!


जाणून घ्या काय आहे कारण?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेवर मोठी कारवाई केली असून 90 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे. आरबीआयने गुरुवारी जारी केलेल्या प्रसिद्धीमध्ये ही माहिती दिली आहे. यासोबतच हा दंड ठोठावण्यामागची कारणेही स्पष्ट केली आहेत. RBIs big crackdown on Axis Bank Fined more than 90 lakhs

…म्हणून आरबीआयने दंड ठोठावला

रिझव्‍‌र्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. विहित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने बँकेला 90.93 लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे सांगण्यात आले.

केवायसी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे 2016 चे पालन करण्यात निष्काळजीपणामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

RBIs big crackdown on Axis Bank Fined more than 90 lakhs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात