विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rajya Sabha Election 12 राज्यांतील 26 राज्यसभा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत 23 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे मीडिया विभाग प्रमुख Pawan Khera, राष्ट्रवादी काँग्रेसच्या Sunetra Pawar यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आता केवळ तीन जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे.Rajya Sabha Election
या निवडणुकीत भाजपचे 12, काँग्रेसचे 5, तेलुगू देसम पक्षाचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1, नॅशनल पीपल्स पार्टीचे 1 आणि जनसेना पक्षाचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.Rajya Sabha Election
भाजपला दोन जागांचा फायदा
या निवडणुकीत भाजपला विशेषतः गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये फायदा झाल्याचे दिसून आले आहे.
मध्य प्रदेशात तीन जागा रिक्त झाल्या होत्या. यापैकी दोन जागा भाजपकडे तर एक जागा काँग्रेसकडे होती. मात्र आता तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
गुजरातमध्ये चार जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी तीन भाजप आणि एक काँग्रेसकडे होती. या चारही जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे या दोन राज्यांत भाजपची राज्यसभेतील ताकद वाढणार आहे.
मीनाक्षी नटराजन यांचे नामांकन फेटाळल्याने वाद
मध्य प्रदेशातील तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसने Meenakshi Natarajan यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडे आवश्यक संख्याबळही होते. मात्र 9 जून रोजी त्यांचे नामांकन अर्ज फेटाळण्यात आला.
या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
लोकसभा विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
“काँग्रेसची जागा चोरली गेली आहे. आमच्या उमेदवाराचे नामांकन किरकोळ कारणावरून फेटाळले, तर भाजप समर्थित उमेदवाराला चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
महाराष्ट्रातील जागा एनडीएकडे कायम
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या Sunetra Pawar यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. ही जागा पुन्हा एनडीएच्या खात्यात गेली आहे.
तर तमिळनाडूमध्ये AIADMKच्या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.
राज्यनिहाय चित्र आंध्र प्रदेश
चार जागांपैकी चारही जागा एनडीएच्या खात्यात गेल्या आहेत. पूर्वी यातील तीन जागा YSR काँग्रेसकडे होत्या.
गुजरात
चारही जागा भाजपने जिंकल्या.
मध्य प्रदेश
तिन्ही जागांवर भाजपचा विजय.
राजस्थान
दोन जागा भाजप आणि एक काँग्रेसकडे गेली. येथे स्थिती कायम राहिली.
कर्नाटक
चार जागांपैकी तीन काँग्रेस आणि एक एनडीएच्या खात्यात गेली. येथे काँग्रेसला मोठा फायदा झाला.
ईशान्य भारत
मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येकी एक जागा भाजपकडे गेली. मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीने आपली जागा कायम राखली.
राज्यसभेतील संख्याबळावर मोठा परिणाम नाही
18 जून रोजी उर्वरित मतदान पूर्ण झाल्यानंतरही राज्यसभेतील एकूण सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता नाही.
245 सदस्यांच्या राज्यसभेत सध्या एनडीएकडे 147 सदस्य आहेत. विरोधकांकडे 67 सदस्य असून इतर प्रादेशिक पक्षांकडे 28 सदस्य आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचे सभागृहातील बहुमत सुरक्षित असल्याचे मानले जात आहे.
राज्यसभा निवडणूक कशी होते?
राज्यसभा निवडणूक ही थेट जनतेकडून होत नाही. राज्यातील आमदार मतदान करून राज्यसभा सदस्य निवडतात.
राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असल्याने दर दोन वर्षांनी एक-तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्यासाठी निवडणूक घेतली जाते.
राज्यसभेच्या एकूण 245 जागांपैकी:
233 सदस्यांची निवड आमदारांद्वारे केली जाते. 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
प्रत्येक राज्यातील आमदारसंख्या आणि रिक्त जागांच्या आधारे विजयासाठी आवश्यक मतांचे गणित निश्चित केले जाते.
18 जूनकडे लक्ष
23 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने बहुतांश राज्यांतील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी उर्वरित तीन जागांवरील मतदानाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर राज्यसभेतील नव्या राजकीय समीकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App